सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सन 1971 मधील युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने या युद्धामध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार सैनिक स्कुलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते, तर खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या कुटुंबांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र सैनिक फेडरेशन उद्योजकता विकास मंच प्रमुख समाधान निकम महाराष्ट्र पोलीस सातारा जिल्हा डिवाइस पी. होम. हंकारे, सीएसडी कॅन्टीन मॅनेजर राजेंद्र शिंदे, कोल्हापूर प्रदेशाध्यक्ष विजय पाटील, एम एस एफ सातारा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, एम एस एफ सातारा जिल्हा सचिव संजय लावंड, एम एस एफ सातारा जिल्हा खजिनदार दिलीप वाघ, एम एस एफ सातारा जिल्हा संघटक विलास जगताप, सातारा तालुका अध्यक्ष संजय कुमार निंबाळकर, सातारा तालुका उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, सातारा तालुका सचिव साबळे, सातारा तालुका संघटक मनोज निंबाळकर, सातारा तालुका खजिनदार रवींद्र राहीने, सातारा तालुका महिला अध्यक्ष उर्मिला पवार व सर्व तालुका अध्यक्ष याठिकाणी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित कुटुंबियांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रत्येक तालुक्यातील दोन माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित काळंगे व सारिका साबळे यांनी केले.