मुंबई । महाराष्ट्रावर नव्हे देशावर, जगावर कोरोनाचे मोठं संकट आलं आहे. कोरोनाविरोधात महाराष्ट्राची, देशाची लढाई अत्यंत नेटाने सुरु आहे. सगळा देश करोनाविरोधातली लढाई लढतो आहे. अशात महाराष्ट्राने देशाला आदर्श घालून द्यावा अशी इच्छा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली होती. कोरोनाविरोधात लढणाऱ्या लढवय्यांसाठी म्हणजेच आपले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य विभागातले कर्मचारी, पोलीस, स्वच्छता विभागातले कामगार यांचे मनोधैर्य वाढवणारा व्हिडीओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर आणला आहे. करोनाविरोधातली लढाई जिंकायचीच आहे हा निर्धार करा असंच या व्हिडीओतून उद्धव ठाकरे सांगत आहेत. तेही एक शब्द न बोलता… अत्यंत सकारात्मक परिणाम साधणारा हा व्हिडीओ शिवसेनेतर्फे पाठवण्यात आला आहे. आपण लढणार आपण जिंकणार असा पॉवरफूल संदेश या व्हिडीओतून देण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ-
”WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”