हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेचा प्रवास हा अत्यंत सोयीचा व खिशाला परवडणारा असल्यामुळे अनेकजण रेल्वेने जाणे पसंत करतात. रेल्वे आपल्या प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जातात. मागच्या काही दिवसांपूर्वीच रेल्वेने वेटिंगवर असलेले तिकीट कन्फर्म करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रिजर्व जागेवरून होणारी वादावादी टळण्यास मदत झाली होती. मात्र अजूनही कोणत्या ना कोणत्या कारणावरून प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचे आपण ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. अशावेळी तुमची तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. चला तर आज आम्ही त्याबाबत तुम्हाला सांगतो ….
कोणते आहेत हे पर्याय?
अनेकदा वाद झाल्यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची मदत घेतली जाते. मात्र मदतीच्यावेळी RPF ला मदत मागण्यापेक्षा तुम्ही गव्हर्न्मेंट रेल्वे पोलिसांकडे (GRP) मदत मागू शकता. रेल्वेतील झालेले वाद सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा अधिकार केवळ गव्हर्न्मेंट रेल्वे पोलिसांकडे आहे. तसेच हातापायीवर प्रकरण आल्यावर हे पोलीस त्या व्यक्तीला अटकही करू शकता. त्यामुळे रेल्वेमध्ये मदत मिळवण्यासाठी तुम्हाला GRP ची मदत फायदेशीर ठरेल.
IRCTC वरतीही मागता येते मदत
रेल्वेमध्ये वाद झाल्यावर जर तो वाद शिगेला पोहचत असेल तर तुम्ही रेल्वेचे असलेले ऍप IRCTC वरती जावून तक्रार नोंदवू शकता. आणि मदत मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला रेल्वेचे IRCTC ऍप डाउनलोड करावे लागेल.
RPF करते हे काम
RPF म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडे रेल्वेमध्ये झालेले वाद मिटवण्यासाठी तक्रार करणे फायदेशीर ठरणारे नाही. कारण रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे कामच हे वेगळे आहे. RPF हे रेल्वेला संपत्ती संरक्षण पुरवण्याचे काम करते. तसेच गैरप्रकार रोखणे, महिलांच्या डब्ब्यात इतरांना न घुसू देणे, बेकायदेशीर प्रवेश रोखणे, रेल्वेतील गैरप्रकार रोखणे, यासारखे अनेक महत्वाची कामे यां विभागातर्फे केली जातात. परंतु अनेकदा वाद निर्माण झाल्यामुळे योग्य पद्धतीची मदत मिळत नाही. आणि ऐन वेळेला मदत न मिळाल्यामुळे लहानात लहान वादाचे रूपांतर सुद्धा मोठ्या वादात होते.