फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे
अनधिकृतरित्या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक( वाळू चोरी) केल्याप्रकरणी फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक येथील दोघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी एक ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू असा सुमारे चार लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सुळ वस्ती कुरवली बुद्रुक हद्दीत अनधिकृतरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक (वाळू चोरी) करण्यात येत होती. तेव्हा या प्रकरणी रमेश दिनकर बाबर (वय- 35, रा.कुरवली बुद्रुक ता. फलटण) व सुनील भीमराव चव्हाण (रा.राजुरी ता. फलटण) यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोघांजणांच्या ताब्यातील ट्रॅक्टर, एक ब्रास वाळू असा चार लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दोघांना नोटिसा बजावण्यात आले असल्याचे फलटण ग्रामीण पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार हांगे करीत आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा