आता ‘या’ फायनान्स कंपनीच्या Home Loan साठी द्यावे लागणार जास्त व्याज !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan: देशातील आघाडीची हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नंतर आता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनेही आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच, RBI ने अलीकडेच रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून कर्जावरील व्याजदर वाढवले जात आहेत. Home Loan

Bajaj Housing Finance cuts interest rate to 6.65% on home loans

बजाज हाऊसिंग फायनान्सने आपल्या कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. पगारदार आणि व्यावसायिक अर्जदारांसाठी बजाज हाऊसिंग फायनान्सचे कर्जावरील व्याजदर आता 7.70 टक्क्यांपासून सुरू होतील. Home Loan

Bajaj Housing Finance Limited Launches E-Home Loan | Global Prime News

अलीकडेच RBI कडून रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करून 5.4 टक्के करण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, मागील तीन पतधोरण आढाव्यात RBI ने रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. या दरवाढीनंतर अनेक बँकांनी देखील आपले व्याजदर वाढवले. Home Loan

LIC Housing Finance Ltd Corporate Office

नुकतेच LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडनेही आपला प्राईम लेंडिंग रेट (PLR) 50 बेस पॉईंटने वाढवला आहे. आता प्राइम लेंडिंग रेटशी जोडलेल्या Home Loan च्या EMI मध्येही वाढ होईल. हे लक्षात घ्या कि, PLR हा स्टॅण्डर्ड व्याजदर आहे ज्याच्याशी LIC हाऊसिंग फायनान्सचे होम लोन जोडले गेले आहे. आता या दरवाढीमुळे LIC हाऊसिंगच्या होम लोनवरील नवीन व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू होईल. 22 ऑगस्ट 2022 पासून हा नवीन व्याजदर लागू झाला आहे. याआधी होम लोनवरील व्याजदर 7.50 टक्क्यांपासून सुरू होत होता.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bajajhousingfinance.in/home-loan-interest-rates

हे पण वाचा :

Aadhar Card संबंधित कामे करण्यासाठी देशभरात उघडली जाणार 114 आधार सेवा केंद्रे

Tokenization of cards : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ महत्वाचे काम !!!

Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!

Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा

दरमहा 12,388 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी LIC च्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक !!!