Aadhar Card संबंधित कामे करण्यासाठी देशभरात उघडली जाणार 114 आधार सेवा केंद्रे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Aadhar Card हे आपल्याकडील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक बनले आहे. सरकारी काम असो कि आर्थिक आजकाल प्रत्येक कामासाठी त्याची गरज भासते. Aadhar Card ची वाढती गरज लक्षात घेऊन, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने लोकांना नवीन आधार मिळवणे किंवा जुने आधार बदलणे सोपे करण्यासाठी आणखी 114 आधार सेवा केंद्रे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 53 मोठ्या शहरांमध्ये ही आधार सेवा केंद्रे उघडली जाणार आहेत.

Latest Aadhaar leak exposes security flaws in app developed by NIC | Latest News India - Hindustan Times

नागरिकांना या केंद्रांवर Aadhar Card शी संबंधित सर्व प्रकारची कामे करता येतील. सध्या देशात 88 आधार सेवा केंद्रे आहेत. ही आधार सेवा केंद्रे आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. अगदी रविवारीही ते बंद नसतील. तसेच ते उघडण्याची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. या केंद्रांमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा दिल्या जातील. हे लक्षात घ्या कि, देशात 35,000 आधार केंद्रेही कार्यरत आहेत. जी बँका, पोस्ट ऑफिस, BSNL ऑफिसेस आणि राज्य सरकार कडून चालविली जातात.

आधार सेवा केंद्र सुविधा

येथे आपल्याला नवीन कार्डसाठी नावनोंदणी करता येईल. याशिवाय जुन्या Aadhar Card वरील नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी बदलता किंवा दुरुस्त करता येईल. याशिवाय या केंद्रांवर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसह फोटो काढणे, बोटांचे ठसे काढणे आदी कामे देखील केली जातील.

Aadhaar Card Update: You Can Avail These Aadhaar Services With No Help of Internet | Step-by-step Guide Here

अपडेट करण्यासाठी द्यावे लागेल शुल्क

जर आपल्याला Aadhar Card मध्ये बायोमेट्रिक्ससहीत इतर कोणतेही बदल करायचे असतील तर त्यासाठी शुल्क द्यावे लागेल. त्याच वेळी, जर कोणत्याही केंद्रावर निश्चित शुल्कापेक्षा जास्त रक्कम मागितली तर UIDAI वेबसाइटवर किंवा 1947 क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवता येईल.

Aadhaar Card Update: Change address in Aadhaar in few simple steps, here's how | Personal Finance News | Zee News

मुलांसाठी बायोमेट्रिक अपडेट फ्रीमध्ये आहे

हे लक्षात घ्या कि, 5 वर्षांखालील मुलांसाठी बाल आधार तयार केला जातो. तसेच त्यांच्या वयाची 5 वर्षे पूर्ण झाल्यावर आणि पुन्हा 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट करावे लागेल. यावेळी बायोमेट्रिक अपडेटसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याशिवाय कोणाच्याही आधार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. Aadhar Card

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/

हे पण वाचा :

robbery : आरोपीने पुण्यातील पेट्रोल पंपावर कुऱ्हाडीने वार करत टाकला दरोडा, CCTV फुटेज आले समोर

Tokenization of cards : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ महत्वाचे काम !!!

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत

इंग्लंडचा कसोटी संघाचे कर्णधार Ben Stokes म्हणाला,” मी IPL मध्ये तेव्हाच खेळेन जेव्हा…”

Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!