हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Interest Rates : सुंदरम होम फायनान्सने आपल्या विविध फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवे दर १ जूनपासून लागू होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, ट्रस्ट आणि इतर व्यक्तींनी ठेवलेल्या डिपॉझिट्सवर हे दर वाढवण्यात आले आहेत. कंपनीने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षांसाठी एखाद्या व्यक्तीने ठेवलेल्या डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.90 टक्के वार्षिक करण्यात आला आहे. त्याच वेळी, तीन ते पाच वर्षांच्या डिपॉझिट्सवर 6.05 टक्के वार्षिक व्याजदर करण्यात आला आहे.
ट्रस्टच्या तीन वर्षांच्या डिपॉझिट्सवर वार्षिक व्याजदर 6.55 टक्के करण्यात आला आहे. दोन वर्षांच्या डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.90 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, चार आणि पाच वर्षांच्या डिपॉझिट्सवरील दर 6.55 टक्के करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना आता दोन वर्षांच्या डिपॉझिट्सवर 6.40 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल तर तीन ते पाच वर्षांच्या डिपॉझिट्सवर आता 6.55 टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. Interest Rates
कंपनीने सांगितले की 12 महिन्यांसाठीच्या डिपॉझिट्सवर व्यक्ती आणि ट्रस्टला आधीप्रमाणेच 5.50 टक्के वार्षिक व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते सहा टक्के असेल. सुंदरम फायनान्स कडून कमीत कमी 4,00,000 रुपये आणि जास्तीत जास्त 400000 रुपयांपर्यंत होमलोन मिळू शकते. मात्र इथे हे लक्षात घ्या कि,हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार लोन मिळेल. Interest Rates
सुंदरम होम फायनान्सची स्थापना 1954 मध्ये झाली. आज या फायनान्स कंपनीच्या देशभरात 640 शाखा आहेत आणि 2 लाखांहून जास्त ठेवीदार आहेत. या कंपनी कडून होम लोनपासून विविध वित्तीय सेवा पुरविल्या जातात. कंपनी कार लोनही देते. त्यांचे देशात 3 लाखांहून जास्त कार लोन ग्राहक आहेत. Interest Rates
अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sundaramhome.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर पहा
Zomato Share : गेल्या पाच दिवसात ‘या’ शेअर्सने घेतली 26% उडी !!! तज्ज्ञांचे काय मत आहे ते पहा
BSNL ची खास ऑफर !!! एकदाच रिचार्ज करून मिळवा 1 वर्षापेक्षा जास्त व्हॅलिडिटी
LPG Price : 1 जून पासून पुन्हा वाढू शकतात एलपीजीच्या किंमती !!!
Dog Birthday In Pune University : बड्डे आहे भावाचा ; जल्लोष साऱ्या गावाचा !!!