अमरावती । राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून हवालदिल झाले आहेत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात द्यावा, कुठल्याच परिस्थितीमध्ये शेतकरी-शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा खासदार म्हणून आपण रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे.
शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोपही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कपाशीच्या शेतात जाऊन पाहणी केली, त्यावेळी सरसकट सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार नवनीत राणांनी केली आहे. त्यांनी दर्यापूर भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली. (Navneet Kaur rana uddhav thackeray)
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आज सोलापूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अकल्लकोट तालुक्यातील रामपूर गावाला भेट दिली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. “सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसात पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत” अशा शब्दांत मुख्यमंत्री जनतेला दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”