सर्वसामन्यांना बसणार महागाईची झळ! गॅस सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील महागाईने सर्वसामन्यांचे घरगुती आर्थिक बजेट बिघडलं असताना आता त्यात गॅस दरवाढीची भर पडणार आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, येत्या वर्षात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं झाल्यास सध्याच्या गॅस दरात १०० ते १५० रुपयांची वाढ होणार असं सांगितलं जात आहे.

सध्या १४.२ किलोच्या घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ५५७ रुपयांच्या आसपास आहे आणि सरकार तेल कंपन्यांना १५७ रुपयांचे अनुदान देते. हे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. कंपन्यांनी दरवाढ सुरू ठेवल्यास आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ६० डॉलर प्रति बॅरेल राहिल्यास सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम घटवली जाऊ शकते. मात्र, असे झाल्यास सिलिंडरचे भाव १०० ते १५० रुपयांनी वाढतील.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे सरकार तेल कंपन्यांना अनुदानापोटी मिळणारी रक्कम थोडी-थोडी कमी करून सरकार गॅस दरावरील नियंत्रण कमी करणार आहे. जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या काळात तेल कंपन्यांनी अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती ६३ रूपयांनी वाढवल्या आहेत. म्हणजेच सहा महिन्यांमध्ये दर महिन्याला १० रूपयांची वाढ झाली आहे. सध्याच्या कच्च्या तेलाच्या किमती पाहता जर पुढील १५ महिने जर याच १० रूपये दराने भाववाढ होत राहिली तर तेल कंपन्यांना सरकारच्या अनुदानाची गरज लागणार नाही.

जुलै २०१९ ते जानेवारी २०२० या काळात गॅस सिलिंडरच्या किमतीत सरासरी १० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडरचे दर सध्या भडकल्याचे दिसत आहेत. आता येत्या काळातही ही वाढ होत राहतील, असे समजते. ग्राहकांना बाजार भावापेक्षा कमी किमतीत सिलिंडर देण्याचे गॅस कंपन्यांवर बंधन आहे. कारण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत किती असावी, यावर सरकारचे नियंत्रण आहे. येत्या काळात हे नियंत्रणच काढण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांचा फायदा होणार असला तरी ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

आता ट्रेनमध्ये खाली बर्थसाठी टीटीईच्या मागे हेलपाटे मारण्याची गरज नाही; रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा

भर सभागृहात उतू गेलं प्रेम, नगरसेवकाने घेतलं नगरसेवकाचे चुंबन; अनेकजण पाहतच राहिले,पहा व्हिडीओ

वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान; धोनी कर्णधार असता तर बुमराहला सुपरओव्हर दिलीचं नसती