महाराष्ट्रातून धावणार आणखी दोन बुलेट ट्रेन; दोन नवीन मार्गांचा प्रस्ताव सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेनला विरोध होत असताना रेल्वेने आणखी दोन मार्ग राज्यात आखले आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने देशभरात ६ नवीन बुलेट ट्रेन मार्गांसाठी तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. ज्यात महाराष्ट्रातील दोन नवीन बुलेट ट्रेन मार्गांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

या दोन प्रस्तावित मार्गांपैकी एक महाराष्ट्रातच तर दुसरा महाराष्ट्राबाहेर जाणारा आहे. मुंबई-नाशिक-नागपूर असा बुलेटट्रेनचा मार्ग असणार असून लांबी 753 किलोमीटर आहे. मुंबई-हैदराबाद असा दुसरा मार्ग असून हा 711 किमी लांबीचा आहे.

या व्यतिरिक्त चेन्नई-बेंगळुरू-म्हैसूर मार्ग लांबी 435 किमी, दिल्ली-जयपुर-उदयपुर-अहमदाबाद लांबी 886 किमी,दिल्ली-ग्रेटर नोएडा-आगरा-लखनऊ-वाराणसी लांबी 865 किमी. दिल्ली-चंडीगढ़-लुधियाना-जालंधर-अमृतसर लांबी 459 किमी. या बुलेट ट्रेन मार्गांचा प्रस्तावात समावेश आहे. या मार्गांची आखणी सुरू झाली असून याचा अहवाल एका वर्षात देण्यात येणार आहे. या मार्गांवर जमीन कशी उपलब्ध होईल, काय समस्या येतील, भाडे किती असेल आदी विचारात घेतला जाणार आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा- 

राज्य शासनाने ‘त्या’ कंपनीच्या सलाईन केल्या बंद; डॉ. थोरातांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांची तडकाफडकी कारवाई

राज्य शासनाने ‘त्या’ कंपनीच्या सलाईन केल्या बंद; डॉ. थोरातांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांची तडकाफडकी कारवाई

आता ट्रेनमध्ये खाली बर्थसाठी टीटीईच्या मागे हेलपाटे मारण्याची गरज नाही; रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा