हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाज ऑटोचे कार्यकारी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या पदाचा कार्यकाळ 31 मार्च 2020 ला संपणार आहे. त्यामुळं राहुल बजाज कंपनीचे नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून पदभार सांभाळणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर बजाज ग्रुपच्या कोणत्याही निर्णयामध्ये ते थेट सहभाग घेऊ शकणार नाहीत.
तब्बल ५० वर्ष कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर बजाज ऑटोच्या कार्यकारी बोर्डने बजाज यांना एप्रिल 2015 मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा होता. कंपनीने सांगितले की, काही कारणांमुळे त्यांनी कंपनीचा संचालक म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बजाज ऑटोच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी राहुल बजाज यांना नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून मंजुरी दिली. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 पासून सुरू होणार आहे. सेबीच्या नियमांनुसार त्यांच्या नियुक्तीसाठी शेअर धारकांकडून पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे.
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज ग्रुपची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा व्यवसाय 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर गेला होता. ‘हमारा बजाज’ अशी जाहिरात करत सामान्यांची शाही सवारी बजाज चेतक स्कूटर रूपात बजाज ही स्कूटर विकणारी आघाडीची कंपनी होती. 2005 मध्ये राहुल यांनी त्यांच्या मुलाकडे जबाबदाऱ्या देण्यास सुरूवात केली. राजीव बजाज यांना व्यवस्थापकीय संचालक बनविले होते.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
कुणाल कामरा काही अर्णबचा पिच्छा सोडेना!प्रवासबंदीनंतर कामराने केली अर्नबच्या ऑफीसबाहेर पोस्टरबाजी
महाराष्ट्रातून धावणार आणखी दोन बुलेट ट्रेन; दोन नवीन मार्गांचा प्रस्ताव सादर
सर्वसामन्यांना बसणार महागाईची झळ! गॅस सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार?