बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्काराचा आरोप; मुंबई पोलिसांनी केला गुन्हा दाखल

0
55
Kangna's Bodyguard
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे यावर एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून ५०,००० रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील डी एन नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ANIच्या वृत्तानुसार आरोपीवर IPC ३७६ आणि ४२० कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या मुंबईतील निभावासस्थानी अर्थात घरी वारंवार जात होता. ते दोघे लिव्हइन मध्ये राहत होते. मात्र पीडित तरुणीने शारीरिक संबंधास नकार दिला होता. त्यावेळी तो अनेकदा तिच्यावर जबरदस्ती करुन शारीरिक संबंध ठेवत असे. एके दिवशी अश्याच प्रकारे तो तिच्या घरी आला असता, पीडितेच्या घरातील ५० हजार रुपये घेऊन ती लागलीच तेथून लंपास झाला. या घटनेनंतर त्या पीडितेने मुंबईतील अंधेरीच्या डी एन नगर पोलिस स्थानकात त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात ते अधिक तपास करत आहेत.

FIR

बॉडीगार्ड कुमार हेगडे विरोधात तक्रार दाखल करणारी महिला ३० वर्षीय ब्यूटीशियन आहे. कुमार हेगडेने या महिलेला लग्नाचे आमिष दाखूल तिच्यावर बलात्कार केला आहे, अशी माहिती तिने दिली. पीडित महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि कुमार गतवर्षी जून महिन्यात एका शूटिंग दरम्यान भेटले होते. त्यानंतर या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीतून प्रेमात झाले. शिवाय हे दोघेही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

https://www.instagram.com/p/BrzdP3oHJnQ/?utm_source=ig_web_copy_link

शारीरिक संबंधास पिडीतेकडून नकार आल्यास कुमार तिच्यावर जबरदस्ती संबंध प्रस्थापित करीत होता. दरम्यान आईची प्रकृती स्थिर नसल्याचे कारण सांगत हेगडेने पीडितेकडून ५० हजार रूपये घेतले. त्यानंतर तो परतला नाही. असे या पीडितेने सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/BscMxmoA18a/?utm_source=ig_web_copy_link

कुमार हेगडे हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगनाचा बॉडीगार्ड आहे. अभिनेत्री कंगना रनौत बद्दल बोलायचे झालेच तर ती कोरोनामुक्त झाल्यानंतर सध्या मनालीमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here