फरसाणा कंपनीला आग : दोन कोटीचे नुकसान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील श्री गणेश फरसाणा यांच्या कंपनीला मंगळवारी सकाळी (दि. 13) अचानक आग लागली. या आगीत अंदाजे दोन कोटीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथे असणाऱ्या गणेश फरसाणा कंपनीला मंगळवारी पहाटे आग लागली. गणेश फरसाण कंपनी ही श्री. गदरे व श्री. कुलकर्णी यांच्या मालकीची आहे. अद्याप कंपनीच्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र घटनास्थळी पोलिस कर्मचारी दाखल झाले असून सदर घटनेची माहीती घेण्याचे काम सुरू केले आहे.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/4419658294712028

आज पहाटे लागलेल्या आगीत कंपनीच्या मशनिरी, कच्चामाल तसेच तयार केलेला माल आणि फर्निचर असे अंदाजे दोन कोटीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग विझवण्यासाठी वालचंदनगर कंपनीचा अग्निशामक बंब, सातारा नगरपालिका अग्निशामक आणि रहिमतपूर नगरपालिका यांचाही बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.