मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानांना भीषण आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही आग लागली असून आगीमागचं कारण अद्यापही समजलं नाही आहे. मार्केट परिसरातील आगीचं स्वरुप आणि धुराचे प्रचंड लोट पाहता ही आग मार्केट इमारतीच्या बहुतांश भागात पसरल्याचं कळत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवळपास ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग लागल्याच्या घटनेनं क्रॉफर्ड मार्केट परिसरात एकच गोंधळ आणि भीती पाहायला मिळाली.

प्राथमिक माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास ही आग लागल्याचं कळत आहे. मार्केटमध्ये असणाऱ्या ४ गाळ्यांना ही आग लागली ज्यानंतर ती वेगानं परसरल्याचं म्हटलं जात आहे. आग लागली त्याचवेळी तातडीनं अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. ही आग लेवल २ म्हणजेच मध्यम स्वरुपाची असल्याची माहिती समोर येत आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून, त्यांना बऱ्याच अंशी यशही मिळालं आहे. या आगीत सौंदर्य प्रसाधनं आणि स्टेशनरी साहित्याच्या ५ ते ६ दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान आग इतक्या भीषण स्वरुपानं पसरत गेली की आगीच्या विळख्यात मार्केटमधील अनेक दुकानं आल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या या मार्केट परिसरात गुरुवारी तुलनेने गर्दी कमी होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in