Satara News साताऱ्यात गोळीबार, युवकाची हत्या : वाढे फाट्यावर हाॅटेल परिसरातील घटना

0
329
Satara Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरा नजीक असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेला युवक शहरातील शुक्रवार पेठेतील असल्याची माहिती समोर येत आहे. युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्याच्या थरारनंतर परिसरात खळबळ उडाली. वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हाॅटेल व्यावसाय चालतो. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नाही.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हाॅटेल व्यावसायिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे. सदरचा मृत्यू झालेला युवक सातारा शहरातील असून त्याच्यावर सातारा जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्याठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. सातारा पोलिस अधिक तपास करत आहेत.