शिंदे गटाला पहिला दणका !! विधिमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती

eknath shinde uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेनं त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची निवड केली होती. त्यांनतर शिंदेनी या निवडीला आव्हान दिले होते. मात्र आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी अजय चौधरी यांची राज्य विधानसभेतील शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे.

संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, उक्त पत्राद्वारे करण्यात आलेली अजय चौधरी, विधानसभा सदस्य यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी केलेल्या निवडीस मान्यता देण्याची विनंती उपाध्यक्ष (कार्यकारी अध्यक्ष), महाराष्ट्र विधानसभा यांनी मान्य केली आहे, असे उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

अजय चौधरी यांच्या नियुक्ती नंतर शिंदे गटातील आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता शिंदे गट न्यायालयात दाद मागणार का?? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.