सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे. ग्रामिण भागातही कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आता ठणठणीत बरा झाला असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरलेल्या महिलेचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे. सातारकरांची ही दिलासादायक बातमी आहे.
सातारा जिल्ह्यात पहिला कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला तेव्हा अनेकांच्या छातीत धडकी भरली होती. दुबईहून आलेल्या ४५ वर्षीय महिला जिल्ह्यातील पहिली कोरोना पोझिटिव्ह रुग्ण ठरली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत योग्य नियोज आखल्याने कोरोनाचा जिल्ह्यात वेगाने प्रादुर्भाव झाला नाही. आता पहिल्या कोरोना पोझिटिव्ह रुग्ण ठरलेल्या ४५ वर्षीय महिलेचे कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर १५ व्या दिवशी सदर रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत ६ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील एकजणाचा इतर आजारातून मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी घरातून अनावश्यक कारणाकरता बाहेर पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा
करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?