राज्यात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात डेल्टा प्लस विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. 13 जून रोजी 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आजीला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

राज्यात सध्या डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण आहेत. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट बाबतीत सध्या तरी मोठ्या प्रमाणावर रुग्ण नाहीत असं ते म्हणाले. डेल्टा व्हेरियंट बाबतीत सध्या 36 जिल्ह्यामधून नमुने घेण्याचे काम सुरू असून केंद्रीय संस्था NCDC ही राज्य सरकारला मदत करत आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ झाली नाही. मात्र हा काळजी करण्यासारखा विषय नसला तरी त्याचे गुणधर्म गंभीर असल्याचं टोपे यांनी सांगितलं..