साता-यात कोरोनाचा पहिला बळी; रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सकलेन मुलाणी

कोरोना विषाणूने मागील ४ दिवसांत महाराष्ट्रात आपले पाय पसरले आहेत. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा ६०० च्या वर गेला असताना आता काही जिल्ह्यांतून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. साताऱ्यात कॅलिफोर्नियावरुन आलेल्या ६३ वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. १४ दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

याच रुग्णाचे कालच्या फेरतपासणीत रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या साताऱ्यातील रुग्णांची संख्या आता पुन्हा ३ झाली आहे. दरम्यान या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं असून लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment