हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. उद्या म्हणजेच शनिवारी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभेच्या तारखांची घोषणा ही करण्यात येईल. यानंतर दिलेल्या तारखानुसार मतदार मतदान केंद्रावर (Voting Center) जाऊन मतदानाची प्रक्रिया पार पाडतील. यामध्ये काही नव्या मतदारांचा देखील समावेश असेल. अनेकजण 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा मतदान करतील. त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
1) मतदार यादीत तुमचे नाव आहे का ते तपासा.
तुम्ही जर नवे मतदार असाल तर मतदार यादीत तुमचे नाव शोधण्यासाठी www.nvsp.in वेबसाईटला भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसत नसल्यास Registration for New Electoral या पर्यायावर क्लिक करा. येथे नाव, जन्मतारीख, पत्ता, आवश्यक कागदपत्र अपलोड करा. यानंतर तुम्हाला एक ट्रेकिंग आयडी देण्यात येईल. याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे हे पाहू शकता.
2) मतदान केंद्रावर मतदान कार्ड घेऊन जावा.
तुमच्याकडे तुमचे मतदान कार्ड असेल तर मतदान करण्यासाठी ते केंद्रावर घेऊन जावा. परंतु तुमच्याकडे जर मतदान कार्ड नसेल तर तुमची ओळख दाखवणारे कोणतेही सरकारी कागदपत्र घेऊन मतदान केंद्रावर जावा. तेथे गेल्यानंतर अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाईल.
3) केंद्रावर जाऊन मतदान करा.
मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला केंद्राबाहेर अनेक वेगवेगळ्या पक्षाचे डेस्क दिसतील. या कोणत्याही डेस्कवर तुम्ही मतदार यादीत तुमचे नाव तपासू शकता. नाव पाहिल्यानंतर आत जाऊन रांगेत उभे राहा. तुमचा नंबर आल्यानंतर स्वतःचे संपूर्ण नाव सांगा. यानंतर तेथील अधिकारी तुमच्या नखावर निळी शाई लावतील.
4) ईव्हीएमवर मत द्या.
मतदानाच्या खोलीत गेल्यानंतर एका कोपऱ्याला तुम्हाला ईव्हीएम मशीन दिसेल. तुम्हाला ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्या उमेदवाराचे नाव मशीनमध्ये पाहून त्याच्या नावापुढे दिसणाऱ्या बटनावर क्लिक करा. पुढे, व्हिव्हीपॅटची वाट पाहा. यातून आलेली स्लीप पाहा. यातून समजेल की तुम्ही योग्य उमेदवाराला मत दिले आहे की नाही.