बरडच्या महिला सरपंचासह कुटुंबातील 5 जणांना पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | बरड (ता. फलटण) येथील महिला सरपंचांसह त्यांच्या कुटुंबातील 5 जणांनी गावातीलच एका कुटुंबातील 4 जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरपंचांसह पाचही संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. राजेंद्र ज्ञानदेव गावडे (वय- 51, रा. बरड, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बरड येथील राजेंद्र गावडे यांनी त्यांच्या घरासमोर चालू असणाऱ्या रस्त्याच्या कामावरील ठेकेदाराला घरासमोरचा रस्ता लवकर करून घ्या, असे सांगितले. परस्पर ठेकेदाराला का सांगितले यांचा राग मनात धरून चिडून बरडच्या सरपंच तृप्ती संतोष गावडे (वय- 36), संतोष पांडुरंग गावडे (वय- 40), कृष्णात पांडुरंग गावडे (वय- 38), पांडुरंग बाबा गावडे (वय- 60), शकुंतला पांडुरंग गावडे (वय- 58, सर्व रा. बरड) यांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरात जाऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.

या मारहाणीत राजेंद्र गावडे व त्यांची पत्नी हेमलता राजेंद्र गावडे, मुलगी प्रियंका गावडे व प्रतीक्षा गावडे यांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घरातील साहित्याचे व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राचे नुकसान केले. सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत आहेत.