हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महाराष्ट्रात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. पण केरळ मध्ये मात्र चक्क बिबट्यालाच मारून त्याच मटण काही लोकांनी खाल्लं आहे. केरळमधील इडुकी गावात हा प्रकरा घडला आहे. घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात जंगलातून बाहेर आलेला बिबट्या अडकला या बहाद्दरांनी वन विभागाला माहिती न देता जंगी पार्टीचा बेत आखला.
विनोद, कुरिकोस, बीनू, कुंजप्पन आणि विन्सेट अशी या आरोपींची नावं आहेत. यामधील विनोदच्या शेतामधील जाळ्यात बिबट्या अडकला होता. त्यानंतर त्याने या सर्वांना बोलावून बिबट्याला ठार मारलं आणि त्याचं मांस शिजवून खाल्लं.
वन विभागानं या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीच्या घरी धाड टाकली आणि तेव्हा विनोदच्या घरातून १० किलो मांस व बिबट्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांनी जप्त केली. बिबट्याची दातं, नखं व कातडे विकण्याचा या सर्व आरोपींची योजना होती. या आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. वन विभागच्या कायद्यानुसार आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’