नाशिकमधील सिन्नरजवळ मोहदरी घाटात भीषण अपघात! विद्यार्थ्यांसह 5 जण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यातील सिन्नरडवळ मोहदरी घाटामध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. या अपघातात (accident) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये मृत पावलेल्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

काय घडले नेमके?
नाशिक येथील 8 ते 9 विद्यार्थी कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचा अचानक टायर फुटला आणि हा भीषण अपघात (accident) झाला. टायर फुटल्यामुळे हि कार दुभाजक तोडून पलीकडून येणाऱ्या दोन वाहनांवर आदळली आणि हा विचित्र अपघात (accident) झाला. मोहदरी घाटात सायंकाळी पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

या अपघातात (accident) कारमधील हरीश बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अन्य दोघांची अजून नावे समजू शकलेली नाहीत. तसेच साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड व ईनोवा कारमधील सुनील दत्तात्रय दळवी व अन्य दोन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमींवर नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका