अवैध वाळू वाहतुकीला सहकार्य : माण तालुक्यातील पाच तलाठी निलंबित तर तहसिलदारांची बदली

Sand
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा – माण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनाधिकृतपणे वाळू वाहतूक व उपसा केला जात होता. या प्रकरणी महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नव्हती. वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून देखील तो कोणतीही कारवाई न करता सोडल्या प्रकरणी आता सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चार तलाठ्यांना निलंबित तर तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर बदलीची कारवाई केली आहे.

यामध्ये माण तालुक्यातील वाकी गावचे तलाठी एस. एल. ढोले, खडकी गावचे तलाठी एस. व्ही. बडदे, मार्डी गावचे तलाठी वाय. बी.अभंग, वरकुटे-म्हसवडचे तलाठी जी. एस. म्हेत्रे, जांभुळणीचे तलाठी बी. एस. वाळके या पाच तलाठ्यांना निलंबित केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्रीच्या वेळी माणसह खटाव तालुक्यात मोठ्या प्रमाणातअनाधिकृत वाळु वाहतूक केली जात होती. यावेळी या अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन तलाठ्यांनी पकडले. त्यावेळी ट्रॅकटर चालविणारा चालक व तलाठी यांच्यात झालेल्या संभाषणाची ऑडीओ आणि व्हीडीओ क्लीप जिल्हाधिकारी यांच्या हाती लागली. त्या क्लिपमध्ये तलाठी आणि वाळू व्यावसायिक यांच्यात काय संभाषण झाले असून वाळूची पकडलेली गाडी सोडण्यासाठी या तलाठ्यांना काय काय अमिषे देण्यात आली हे या ऑडिओ क्लिप मधून समोर आले आहे.

याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यानी संबंधित पाच तलाठी व तहसिलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच म्हसवड येथील महसुल मंडल निरिक्षक किशोर शेंडे यांचेवर हि निलंबनाची टांगती तलवार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे महसुल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. माणगंगा नदीतून अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. मात्र, संबंधित बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोणतीही कारवाई न करता सदर वाहन सोडून दिले. यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील नियम 10 अन्वये शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत माण तहसिलदार यांनी प्रस्ताव माण-खटावचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांना चुकीचा अहवाल सादर –

तहसीलदार माण यांनी अवैध गौण खनिज वाहतूक उत्खनन रोखणेकामी नेमूण दिलेल्या कामात हलगर्जीपणा, मंडल अधिकारी म्हसवड के.पी. शेंडे पथक प्रमुख यांचे समवेत या कार्यालयास चुकीचा अहवाल सादर केला. या प्रकरणी प्रशासनाची दिशाभूल करणे, गौण खनिजाची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यासाठी कारणीभूत प्रशासनाची प्रतिमा मलीन करणे, गौण खनिजाची अवैध व वाहतूक करणाऱ्यांशी तडजोड करत असलेचे व्हिडोओ क्लिपवरून दिसून आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेल्या या निलंबनाच्या कारवाईचे म्हसवड जनतेतून स्वागत होत आहे.