Fixed Deposit : जर तुम्हाला मजबूत रिटर्न हवा असेल तर येथे FD करा, कोणती बँक सर्वाधिक व्याज देत आहे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बहुतेक लोकं बचत खात्यात पैसे ठेवण्याऐवजी फिक्स्ड डिपॉझिट (FD) घेणे पसंत करतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इतर योजनांच्या तुलनेत ती सुरक्षित आणि कमीत कमी धोकादायक असते. यामध्ये शॉर्ट टर्म ते लॉंग टर्म साठीही गुंतवणूक करता येते.

1 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्ससाठी सर्वाधिक FD दर देणाऱ्या बँकांवर एक नजर टाकूयात …

हे दर 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आणि पाच वर्षांच्या कालावधीचे व्याजदर आहेत
1 DBS Bank – 5.70% – 6.50%
2 IndusInd Bank – 5.50% – 6.50%
3 RBL Bank – 5.40% – 6.50%
4 Yes Bank – 5.25% – 6.50%
6 IDFC FIRST Bank – 5.25% 6.00%
8 Axis Bank– 4.40% – 5.75%

आता सरकारी बँकांमधील FD वरील व्याजदर जाणून घ्या
1. युनियन बँक ऑफ इंडिया 5.5%
2. कॅनरा बँक 5.5%
3. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 5.3%
4. पंजाब आणि सिंध बँक 5.3%
5. बँक ऑफ बडोदा 5.25%

FD चे दोन प्रकार आहेत
साधारणपणे FD चे दोन प्रकार असतात. पहिली क्युम्युलेटिव्ह FD आहे आणि दुसरी नॉन-क्युम्युलेटिव्ह FD आहे. यामध्ये त्रैमासिक आणि वार्षिक आधारावर व्याज दिले जाते. मात्र, आपण नियमित अंतराने देखील व्याज घेऊ शकता.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
कोणत्याही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करण्यापूर्वी, तुम्ही जवळच्या शाखेत जाऊन त्यासंबंधीची संपूर्ण माहिती घ्यावी. प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर आणि अटी वेगवेगळ्या असतात. FD ची रक्कम आणि वेळेनुसार व्याजदर बदलू शकतो. अशा परिस्थितीत, गुंतवणूक करण्यापूर्वी, बँकेत जा आणि सर्वकाही जाणून घ्या.

Leave a Comment