Fixed Deposits करताय !!! जरा थांबा… ‘ही’ महत्वाची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fixed Deposits: गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स हा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहेत. आजही अनेक लोकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सलाच पहिली पसंती मिळते आहे. गॅरेंटेड रिटर्न आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे मोठ्या संख्येने लोकं एफडीची निवड करतात. सध्या जवळपास सर्व बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली ​​आहे. अनेक बँकांनी एकाच महिन्यात तब्ब्ल दोन वेळा FD वरील व्याजदर वाढवला आहे. यामध्ये अल्पकालावधी पासून ते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करता येते. आज आपण बँकेच्या एफडी संबंधीचे नियम आणि त्यावर भरावा लागणाऱ्या टॅक्स बाबतची माहिती माहिती जाणून घेणार आहोत…

Types of fixed deposit: How to Choose the Right FD | IDFC FIRST Bank

Fixed Deposits चे प्रकार जाणून घ्या

साधारणपणे FD चे दोन प्रकार असतात. पहिली क्युम्युलेटिव्ह एफडी आणि दुसरी नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडी. यामध्ये व्याज तिमाही आणि वार्षिक आधारावर दिले जाते. मात्र आपल्याला नियमित अंतराने देखील व्याज घेता येते.

What is Fixed Deposit - FD Meaning and Features | IDFC FIRST Bank

Fixed Deposits मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घ्या

>> Fixed Deposits गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो.

>> यामध्ये जमा केलेल्या पैशांवर कोणतीही जोखीम नसते. यासोबतच, आपल्याला ठराविक कालावधीमध्ये रिटर्नही मिळू शकतो.

>> यामध्ये गुंतवलेल्या मूळ रकमेवर बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम होत नाही.

>> या योजनेत गुंतवणूकदार मासिकपणे व्याजाचा लाभ घेता येईल.

>> सर्वसाधारणपणे FD वर मिळणारा व्याजदर जास्त असतो. मात्र ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक रिटर्न देते.

>> कोणत्याही FD मध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करता येते. तसेच यानंतर गुंतवणूकदाराला जास्त डिपॉझिट्स करायचे असतील तर त्यासाठी वेगळे एफडी खाते उघडावे लागेल.

>> FD साठी मॅच्युरिटी कालावधी असतो, यामध्ये अनेक वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. मात्र गरज भासल्यास मुदतीआधीही पैसे काढता येतात. जर मुदतीआधीच FD तोडली तर त्यावर काही प्रमाणात दंड भरावा लागेल. जो प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असतो.

Latest Bank FD Rates 2021: HDFC Raises Interest Rates On Fixed Deposits | Fixed Deposit करने वालों के लिए खुशखबरी! HDFC ने FD पर बढ़ाईं ब्याज दरें, 0.25 परसेंट ज्यादा मिलेगा ब्याज |

Fixed Deposits साठी टॅक्सचा नियम जाणून घ्या

FD वर 0 ते 30% कर कपात लागू असते. गुंतवणूकदाराच्या इन्कम टॅक्स स्लॅबच्या आधारे ते कापले जाते. यामध्ये जर आपण एका वर्षात 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावले तर FD वर 10% टॅक्स भरावा लागेल. मात्र, यासाठी पॅन कार्डची कॉपी सादर करावी लागेल. तसेच पॅनकार्ड सादर न केल्यास त्यावर 20 टक्के TDS कापला जाईल. जर गुंतवणूकदारांना कर कपात टाळायची असेल, तर त्यासाठी बँकेत जाऊन फॉर्म 15A जमा करावा लागेल. कोणत्याही इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये न येणाऱ्या लोकांसाठी हे लागू असेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना देखील कर कपात टाळण्यासाठी फॉर्म 15H सबमिट करावा लागेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/rates

हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा