गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत सचिन सावंत यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सी-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेल्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. 22 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं 30 ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या सगळ्या घडामोंडीवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.

सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीनंतर शिंदे-फडणवीस हे दुसरं सरकार आहे, गुजरातच्या हितासाठी मोदी सरकारच्या आज्ञेनुसार अतिशय समर्पित होऊन काम करत आहे. गुजरात सुजलाम, सुफलाम व्हावा यासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहे.

एक मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार, दुसरं गुजरातचं सरकार, तिसरं महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार. त्यामुळे ज्या वेगाने महाराष्ट्रातील काही प्रकल्प काही महिन्यांमध्ये गुजरातकडे चालले आहेत, तो वेग पाहता जितका काळ हे सरकार राहील, तेवढ्या कालावधीत महाराष्ट्र कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.” असे त्यांनी (Sachin Sawant) या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय