हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 22 जानेवारी 2024 रोजी कैक वर्षांची राम मंदिराची प्रतीक्षा संपणार आहे. कारण या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन (Ram Mandir) करणार आहेत. त्यामुळे राम मंदिर बघण्यासाठी अनेकांना उत्सुकता आहे. राम मंदिर उदघाटन सोहळा बघण्यासाठी देशभरातून राम भक्तांनी अयोध्येचे तिकीट बुक केले आहेत. या प्रवाश्यांसाठी आता अजून एक आनंदाची बातमी आहे. अयोध्येला जाण्यासाठी आता इंडिगो कंपनी विमानसेवा (Flights to Ayodhya) देणार आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
अयोध्येला आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा होणार सुरु
अयोध्येच्या राम मंदिराच्या उदघाटनासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. या अभिषेक सोहळ्याआधी आयोध्येमध्ये अयोध्येला आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा सुरु होणार आहे. त्याच धर्तीवर एअर इंडिया (Air India) दिल्ली आणि अयोध्येदरम्यान 30 डिसेंबरपासून विमानसेवा सुरु होणार असल्याची घोषणा करणार आहे.
30 डिसेंबरला निघणार पहिली फ्लाईट
एकीकडे इंडिगोने नुकताच 10 कोटी पेक्षा जास्त उड्डाणं घेतल्याचा विक्रम करून देशातील पहिली विमान सेवा देणारी कंपनी बनली आहे आणि दुसरीकडे इंडिगो आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा सुरु करणार आहे. असे असताना पहिली फ्लाईट ही अयोध्येला जाण्यासाठी 30 डिसेंबर रोजी उद्घाटन फ्लाइट IX 2789 ही दिल्लीहून सकाळी 11 वाजता निघणार आहे. तर दुपारी 12.20 वाजता अयोध्येत उतरेल. तर परतीची फ्लाईट फ्लाइट क्रमांक IX 1769 ही दुपारी 12.50 वाजता दिल्लीसाठी रवाना होईल आणि 2.10 वाजता दिल्लीला पोहोचेल.
अवघ्या 80 मिनिटाचा असेल प्रवास
दिल्ली ते अयोध्या हे अंतर 689.3 किलोमीटर एवढे असून इंडिगो फ्लाईटने हे अंतर केवळ 80 मिनिटात पर केले जाणार आहे. त्यामुळे प्रवासाला ते सोयीस्कर असणार आहे. इंडिगोने 13 डिसेंबरला सांगितले होते की, 30 डिसेंबर रोजी दिल्ली ते अयोध्या विमानतळापर्यंतचे उद्घाटन उड्डाण चालवले जाणार आहे. त्याचबरोबर 6 जानेवारीपासून व्यावसायिक सेवाही सुरू होणार आहेत. 8 डिसेंबर रोजी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले होते की, अयोध्येतील विमानतळ या महिन्याच्या अखेरीस तयार होणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या हस्ते अयोध्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात ही सेवा प्रवाश्यांना मिळणार आहे.