जितेंद्र आव्हाडांचे खळबळजनक ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेतील कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी येऊन सभागृहांमध्ये गोंधळ माजवला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली. तसेच काही खासदारांनी सभागृहात कामकाज सुरू असताना या प्रकरणी गोंधळ देखील घातला. ज्यामुळे संसदेतील अध्यक्षांनी 141 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे अमोल कोल्हे तसेच काँग्रेसच्या अनेक खासदारांचा समावेश आहे.

सध्या संसदीय अध्यक्षांनी केलेल्या या थेट कारवाईमुळे राजकिय वातावरण चांगलेच पेटले आहे. यामध्येच, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची सर्व खासदारांपुढे नक्कल केल्यामुळे या वादात आणखीन एक ठिणगी पडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. नुकत्याच जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, भाजप सरकारची तुलना थेट नाझी सरकारशी केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, लोकशाही विरोधाला आळा घालण्यासाठी नाझी सरकारने 1933 मध्ये जर्मनीमध्ये “मॅलिशियस प्रॅक्टिसेस ऍक्ट” नावाचा कायदा मंजूर केला होता. या कायद्यानुसार नेत्यांवर टीका करणे त्यांच्याबद्दल वक्तव्य करणे किंवा खाजगी त्यांची थट्टा करणे हा थेट गुन्हा मानला जात असेल. यानंतर, अटक केलेल्यांना छळछावणीत पाठवले जात असे. हा इतिहास तुमच्यासोबत शेअर करण्याची योग्य वेळ आहे”

दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सरकारच्या सुरक्षा यंत्रणावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.