Flipcart Recruitment 2024 | लवकरच चालू होणार फ्लिपकार्टचा सेल; 1 लाखापेक्षा जास्त लोकांना मिळणार नोकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Flipcart Recruitment 2024 | देशामध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्या आहेत. या कंपन्या घरबसल्या लोकांना त्यांच्या सेवा प्रदान करत असतात. अशातच फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स कंपन्यांमध्ये एक मोठे नाव आहे. सध्या फ्लिपकार्टचा (Flipcart Recruitment 2024) सर्वात मोठा बिग बिलियन डेज चालू होणार आहे. आणि यामुळे आता देशात अनेक लोकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. फ्लिपकार्ट अंतर्गत जवळपास देशातील एक लाख नव्या रोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहेत. या भरती अंतर्गत गोदाम दुकान आणि डिलिव्हरीसाठी भरती होणार आहे. दिवाळीपूर्वी ही सगळी पदे flipkart अंतर्गत भरण्यात येणार आहेत.

फ्लिपकार्ट (Flipcart Recruitment 2024) लवकरच त्यांचा बिग बिलियन डेज चालू करणार आहे. आणि यासाठी त्यांना अनेक कामगारांची गरज देखील लागणार आहे. फ्लिपकार्टची डिलिव्हरी ही ऑल ओव्हर इंडियामध्ये होत असते. त्यामुळे संपूर्ण देशांमध्ये आता जवळपास एक लाख कामगारांची भरती फ्लिपकार्ट अंतर्गत होणार आहेत. फ्लिपकार्ट संपूर्ण देशभरात अनेक गोदामे देखील उघडली आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करायला तसेच डिलिव्हरी करण्यासाठी त्यांना अनेक कामगारांची गरज आहे.

एक लाख नव्या रोजगारांच्या संधी | Flipcart Recruitment 2024

सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट त्यांच्या नागरिकांना जलद गतीने सेवा देण्याचे काम करत असते. त्याचप्रमाणे सणासुदीच्या काळात त्यांच्या अनेक प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात ऑफर देखील दिल्या जातात. त्यामुळेच आता भारतामध्ये गणपती त्याचप्रमाणे दसरा, दिवाळी हे सण लागोपाठ येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आता लवकरात लवकर सेवा देण्यासाठी फ्लिपकार्ट सर्वात मोठा द बिग बिलियन डेज सुरू करणार आहे. यामध्ये जवळपास देशभरातून एक लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहेत. या बिग बिलियन डे पूर्वी त्यांनी नऊ शहरामध्ये 11 नवीन गोदामे सुरू केलेली आहेत
त्यामुळे देशभरात सध्या फ्लिपकार्टची 83 गोदामे आहेत.

‘या’ क्षेत्रांत सर्वाधिक नोकऱ्या

या नोकऱ्यांबाबत बोलताना फ्लिपकार्ट अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या नोकऱ्या या सप्लाय चेन या विविध क्षेत्रात असतील. यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजर, वेअर हाऊस, असोसिएट्स लॉजिस्टिक, कॉर्डिनेटर, किराणा भागीदार, डिलिव्हरी ड्रायव्हर्स इत्यादींचा समावेश असणार आहे. आता सणासुदीच्या काळात नव्या कर्मचाऱ्यांना कौशल्य आणि प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम देखील होणार आहे.