Flipcart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; ऑर्डर रद्द केल्यास द्यावी लागणार कॅन्सलेशन फी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | फ्लिपकार्ट ही आपल्या देशातील नामांकित ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे. आज काल लोकांमध्ये ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून रोज अनेक ऑर्डर देखील केल्या जातात. यामुळे अगदी घर बसल्या तुम्हाला वस्तू मिळतात. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज पडत नाही. तसेच तुम्हाला जर वस्तू आवडत नसेल, तर तुम्हाला ती रद्द देखील करता येते. परंतु आता यापुढे असे होणार नाही. कारण फ्लिपकार्ट वरून तर तुम्ही कधी वस्तू ऑर्डर केली असेल. आणि ती जर तुम्हाला कॅन्सल करायची असेल, तर त्यासाठी ग्राहकांना आता पैसे मोजावे लागणार आहे. म्हणजेच आता फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांसाठी कॅन्सलेशन फी लागू करणार आहे.

फ्लिपकार्ट त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेल्या वस्तू कॅन्सल करायच्या असेल, तर ग्राहकांना कॅन्सलेशन फी लागू करण्याचा विचार फ्लिपकार्ट करत आहे. याबद्दलची माहिती एका नव्या अहवालातून समोर आलेली आहे.

कॅन्सलेशन फी का आकारली जाणार ?

विक्रेते आणि लॉजिस्टिक भागीदारांचा वेळ आणि त्यांची मेहनत लक्षात घेता, जर तुम्ही ऑर्डर रद्द केली, तर त्याची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. असे फ्लिपकार्ट सह इतर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मने देखील ठरवलेले आहे. त्यामुळे आता या नवीन धोरणामुळे कंपनी ग्राहकांकडून 20 रुपये जास्त शुल्क आकारणार आहे. अजूनही flipkart ने याबाबत कोणतीही अधिक माहिती दिलेली नाही. केवळ समोर आलेल्या स्क्रीनशॉट वरून असा अंदाज बांधला जात आहे. परंतु वेगवेगळ्या ऑर्डरसाठी कॅन्सलेशन फी ही वेगवेगळी असू शकते. असे देखील सांगितले जात आहे. तसेच प्रीमियर वस्तूंसाठी कॅन्सलेशन फी जास्त असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

ग्राहकांनी दिलेल्या मर्यादित वेळेत ऑर्डर रद्द केली, तर त्यांना कोणतीही कॅन्सलेशन फी भरावी लागणार नाही. परंतु ऑर्डर प्रोसेसमध्ये असेल किंवा शिपिंग स्टेजमध्ये असेल आणि ग्राहकांनी ऑर्डर कॅन्सल केली, तर त्यांना कॅन्सलेशन फी बंधनकारक असणार आहे. असे नवीन अपडेट्स समोर आलेले आहेत.