Flipkart Big Upgrade Sale : Flipkart वर सुरु झालाय बंपर सेल; स्वस्तात मिळणार या वस्तू

Flipkart Big Upgrade Sale
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Flipkart Big Upgrade Sale : तुम्ही जर ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचे शौकीन असाल तर मित्रानो, हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट वर आजपासून बम्पर सेल सुरु झाला आहे. Flipkart Big Upgrade Sale असे या सेलचे नाव असून यामध्ये तुम्हाला अनेक वस्तूंवर बम्पर डिस्काउंट मिळणार आहे. हा सेल 9 मार्च ते 15 मार्च 2024 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता खरेदीसाठी उशीर करू नका.

Flipkart Big Upgrade Sale मध्ये, तुम्ही 9 मार्च ते 15 मार्च पर्यंत स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, एअर कंडिशनर आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करता येतील. बिग अपग्रेड सेलच्या माध्यमातून तुम्ही प्रीमियम गॅझेट्स देखील अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता. या सेलमध्ये बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. त्यानुसार, Axis Bank क्रेडिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट सूट मिळवू शकता. स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर्स आणि इतर उत्पादनांवर या ऑफर उपलब्ध आहेत.

iPhone च्या चाहत्यांना सुद्धा फ्लिपकार्टचा हा सेल चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. कारण या सेलमध्ये iPhone 15 वर बंपर ऑफर देण्यात आली आहेत. iPhone फ्लिपकार्टवर 65,999 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाला आहे. मात्र हा मोबाईल फोन तुम्ही 62,999 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. कारण ॲक्सिस बँकेच्या कार्डवर 3300 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

TV आणि AC वर मिळणार सूट – Flipkart Big Upgrade Sale

टीव्ही आणि एसी वर सुद्धा ग्राहकांना मोठी सूट देण्यात येत आहे. Flipkart Big Upgrade Sale मध्ये, सॅमसंगचा स्मार्ट क्रिस्टल व्हिजन 4K टीव्ही फक्त 26 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येतोय. तर दुसरीकडे, जर LG कंपनीचा 1.5 टन 3 स्टार एसी फक्त 33,490 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका असल्याने एसीची मागणी वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर या सेल मधून तुम्ही कमी किमतीत एसी खरेदी करू शकता.