हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo T1 या स्मार्टफोनसाठी ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Flipkart वर मोठी सूट दिली जात आहे. या फोनवर 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. फ्लिपकार्टवर हा फोन 19,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट झाला आहे. तसेच यावरील डिस्काउंटनंतर हा फोन फक्त 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय यावर बँकांकडून अनेक ऑफर्सही उपलब्ध आहेत. हे जाणून घ्या कि, हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के सूटही मिळू शकते. 9 फेब्रुवारी 2022 रोजी हा Vivo T1 देशात लॉन्च करण्यात आला होता.
या Vivo T1 फोनमध्ये 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi 802.11 ac/b/g/n, मोबाइल हॉटस्पॉट, ब्लूटूथ 5.1, 2G, 3G, 4G आणि 5G सपोर्ट सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. Vivo T1 5G फोनमध्ये 4 GB रॅम आणि 128 GB इनबिल्ट स्टोरेज आहे.
कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल असे 3 कॅमेरे आहेत.तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनच्या समोरील बाजूस 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा उपलब्ध आहे.
Vivo T1 हा एक हाय परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन आहे. ज्यामध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन रेनबो फॅन्टसी, स्टारलाईट ब्लॅक कलर मध्ये लाँच केला आहे. Vivo T1 च्या या फोनमध्ये 401 PPI आणि 120 Hz रिफ्रेश रेट सहीत 6.58-इंचाच्या IPS LCD डिस्प्ले मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/vivo-t1-5g-starlight-black-128-gb/p/itm594222523bd8f
हे पण वाचा :
Fly-In Community : एक असे गाव जिथे प्रत्येकाकडे आहे स्वतःचं विमान; जाणून घ्या ‘या’ गावाबाबतची माहिती
आता WhatsApp वर मिळवा LIC पॉलिसीशी संबंधित प्रत्येक माहिती, घरबसल्या उपलब्ध होणार ‘या’ सेवा
IDFC First Bank ने ग्राहकांना दिला धक्का, आता क्रेडिट कार्डने भाडे भरण्यासाठी द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क
MS Dhoni दिसणार चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत, सोशल मीडियावर फोटोने घातला धुमाकूळ
Oppo Reno 8T 5G : 108MP कॅमेरा असलेल्या ‘या’ नवीन स्मार्टफोनची मार्केटमध्ये जोरदार एंट्री, पहा किंमती अन् फीचर्स