हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. परंतु आता खुद्द त्या महिलेने यावर भाष्य करत आपलं मत व्यक्त केल आहे.
भास्कर जाधव आणि आमचे गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. त्यांनी माझ्या मुलाला वडीलकीच्या नात्याने सांगितलं. भास्कर जाधव यांनी अरेरावी केली नाही, त्यांचा आवाजच तसा आहे त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला असे त्या महिलेने सांगितलं.
नेमकं काय घडलं-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूण च्या बाजारपेठ मध्ये पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेले असता एका महिलेने उद्धव ठाकरेंना मदत मागितली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजव… उद्या ये…, असं भास्कर जाधव बोलत होते.