Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही (Flying Bike) हवेत उडणारे विमान किंवा हेलिकॉप्टर बघितलं असेल पण आता हवेत उडणारी बाईकही आली आहे. होय तुम्हांला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट येथील कोलमन ए यंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील पहिली एअर हॉवर बाइक ‘XTURISMO’ लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत 6.19 करोड़ आहे.

Flying Bike

40 मिनिटे हवेत उडण्यास सक्षम-

XTURISMO हॉवर बाईक जपानी स्टार्टअप (Flying Bike) कंपनी AERWINS टेक्नॉलॉजीने बनवली आहे. ही अनोखी 40 मिनिटे हवेत उडण्यास सक्षम आहे ते सुद्धा 62 मैल प्रति तास म्हणजेच 100 किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकते. अमेरिकेत या बाइकला ‘लँड स्पीडर फॉर द डार्क साइड’ असे नाव देण्यात आले आहे. या उडणाऱ्या हॉवरबाईकचे वजन हलके ठेवण्यासाठी ती पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिझाइन- (Flying Bike)

बाईकचे डिझाइन गेल्या (Flying Bike) दोन वर्षांपासून विकसित केले जात आहे. या हवेत उडणाऱ्या बाइकमध्ये रायडर सुरक्षित राहण्यासाठी विविध प्रकारचे सेन्सर बसवण्यात आले आहेत. सध्या ही एक सिंगल रायडर बाइक आहे. XTURISMO च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर त्याची बॉडी बाईकसारखी दिसते. तसेच ते हेलिकॉप्टरप्रमाणे पृष्ठभागावरून हवेत उडते. तसेच यातून सुरक्षित उतरण्यासाठी स्किड बसवण्यात आले आहे.

Flying Bike

किंमत – 

XTurismo hoverbike ची किंमत US$ 777,000 म्हणजेच अंदाजे 6.19 कोटी रुपये आहे. परंतु AERWINS च्या म्हणण्यानुसार, या फ्लाइंग बाईकच्या (Flying Bike) छोट्या इलेक्ट्रिक प्रकाराची किंमत अंदाजे रु. 40 लाख रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु यास 2-3 वर्षे लागतील.

हे पण वाचा :

Dlite RX-100 : Dlite ने सादर केली नवी इलेक्ट्रिक स्कुटर; एका चार्जवर 70 किमी धावणार

Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते