HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (HOP OXO Electric Bike) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता जयपूर येथील HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने कंपनीने आपली नवीन HOP OXO इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत 1.25 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल HOP OXO आणि HOP OXO X या दोन प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे.ही बाईक रिव्हॉल्ट RV400, Oben Rorr सारख्या इलेक्ट्रिक मोटरसायकलशी स्पर्धा करेल.

HOP OXO Electric Bike

वैशिष्ट्ये –

या इलेक्ट्रिक (HOP OXO Electric Bike) बाइकमध्ये मल्टी-मोड रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, 4G कनेक्टिव्हिटी आणि स्पीड कंट्रोल, जिओ-फेन्सिंग, अँटी-थेफ्ट सिस्टम, राइड स्टॅटिस्टिक्स सह अनेक वैशिष्ट्ये आहेत. या गाडीचा लुक खूपच जबरदस्त आहे.

HOP OXO Electric Bike

90 किमी टॉप स्पीड-

नवीन HOP OXO इलेक्ट्रिक बाइकमध्ये 6200W पीक पॉवर मोटरसह 72V आर्किटेक्चर आहे. ही मोटर मागील चाकाच्या टॉर्कवर 200 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. (HOP OXO Electric Bike) बाइकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ही ई-बाईक अवघ्या 4 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. यात अतिरिक्त टर्बो मोडसह इको, पॉवर आणि स्पोर्ट या तीन राइड मोड आहेत.

 

HOP OXO Electric Bike 

150 किमी रेंज- (HOP OXO Electric Bike)

कंपनीचा दावा आहे की HOP OXO इलेक्ट्रिक बाइक एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 150 किमी अंतर कापू शकते. कंपनीचे म्हणणे आहे की ते पोर्टेबल स्मार्ट (HOP OXO Electric Bike) चार्जरवरून कोणत्याही 16 amp पॉवर सॉकेटद्वारे चार्ज केले जाऊ शकते, जे सरासरी 0 ते 80 टक्के 4 तासांपेक्षा कमी वेळेत चार्ज होते.

हे पण वाचा : 

Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ही Electric कार; कुठे होतेय विक्री??

Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल इतके मायलेज

iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज