Flying Taxi : अबब!! हवेत उडणारी Taxi; 200 किलोमीटर रेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही (Flying Taxi) टॅक्सी जमिनीवर फिरताना पाहिली असेल. परंतु हवेतून सुद्धा टॅक्सी फिरू शकेल असा विचार तुम्ही केलाय का? नाही ना .. परंतु आयआयटी चेन्नईच्या विद्यार्थ्यांच्या एका स्टार्टअपने अशीच एक फ्लाइंग टॅक्सी तयार केली आहे. या फ्लाइंग टॅक्सीचा प्रोटोटाइप बंगळुरूमध्ये झालेल्या एरो शोदरम्यान सादर करण्यात आला होता. e200 असं या उडत्या टॅक्सिचे नाव असून ही टॅक्सी तब्बल 200 किलोमीटर पर्यंत रेंज देते.

ही इलेक्ट्रिक टॅक्सी सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा (Flying Taxi) वेगाने फिरण्यास सक्षम असेल, असा स्टार्टअपचा दावा आहे. या टॅक्सीची खास गोष्ट म्हणजे ती उभी लँडिंग आणि टेकऑफ सहज करू शकते. या टॅक्सीला हवेत भरारी घेण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी सुद्धा जास्त जागा लागणार नाही. टॅक्सी पार्क करण्यासाठी फक्त 25 चौरस मीटर जागेची गरज आहे. e200 टॅक्सीमध्ये प्रत्येकी दोन ब्लेडसह चार रोटर आहेत. जवळपास 200 किलो वजन उचलण्यास ही उडती टॅक्सी सक्षम आहे.

200 किलोमीटर रेंज- (Flying Taxi)

या फ्लाइंग टॅक्सीत दोन जण एकत्र फिरू शकतात. हि टॅक्सी प्रतितास 150 किलोमीटर ते 200 किलोमीटर पर्यंत भरारी घेऊ शकते तसेच 1500 फूट उंचीपर्यंत वर जाऊ शकते. आपल्या भारतात ही उडती टॅक्सी चालेल कि नाही याबाबत कंपनीने (Flying Taxi) अद्याप काही सांगितलेलं नाही. तसेच या इलेक्ट्रिक टॅक्सीची किमत सुद्धा स्पष्ट केलेली नाही.