औरंगाबाद – शेंद्रा एमआयडिसी ते वाळूज पर्यंत एकच उड्डाणपूल मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे सोबत यासंदर्भात अंतिम चर्चा झाली केंद्र आणि राज्य शासनाचे निगडित महामेट्रो कंपनीच डीपीआर तयार करणार असल्याचे महापालिका प्रशासन अस्तिक कुमार पांडेय यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत चार दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली. या बैठकीत चिकलठाणा ते वाळुज डीपीआर तयार करण्यावर चर्चा झाली होती. औरंगाबाद स्मार्ट सिटीने डीपीआर तयार करण्यासाठी अगोदरच महामेट्रो कंपनीची नियुक्ती केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डीपीआर तयार करणार नाही.
याविषयी अधिक माहिती देताना पांडेय यांनी सांगितले की, उड्डाणपुलाचा डीपीआर महामेट्रो तयार करणार आहे. गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डीपीआर तयार करावा असे ठरले असले, तरी महामेट्रोने हे काम सुरू केल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.