शेअर मार्केट मधील Pump and Dump टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Pump and Dump
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल शेअर मार्केट्मधील गुंतवणुकीचा कल वाढतो आहे. शेअर मार्केट्मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाला मार्केट बाबत माहिती असण्याची शक्यता कमीच आहे. अनेक लोकं सोशल मीडिया चॅनेल्स वरील शेअर मार्केट तज्ञांच्या हवाल्याने शेअर्सची खरेदी आणि विक्री करतात. मात्र गुंतवणूकदारांच्या याच कुवतपणाचा फायदा घेण्याचा काही जण प्रयत्न करतात. अशी लोकं सोशल मीडिया द्वारे लोकांना चुकीच्या टिप्स देऊन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देतात.

शेअर मार्केटच्या भाषेत अशा प्रकाराला Pump and Dump असे म्हंटले जाते. शेअर मार्केटमध्ये Pump and Dump फार पूर्वीपासूनच केले जाते. तसेच याद्वारे खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक देखील केली जाते.

Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक
Pump and Dump करणारी लोकं मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी करतात आणि त्यानंतर मार्केट मध्ये विविध माध्यमातून त्याविषयीच्या बातम्या पसरवून त्या शेअर्सची किंमत वाढवतात. आजकाल यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्यामध्ये Whatsapp,Telegram सारख्या Apps वर तयार केलेल्या ग्रुप्सद्वारे Stock Tips दिल्या जातात. यानंतर या ग्रुप्सवर पसरवलेल्या Fake Stock Tips द्वारे शेअर्सच्या किंमती वाढवल्या जातात आणि फसवणूक करणारे हे शेअर्स विकून पसार होतात जे अनेकांच्या लक्षातच येत नाहीत.

जी लोकं जास्त पैशांच्या हव्यासापोटी अशा टिप्सना बळी पडून शेअर्स खरेदी करतात ते आपलेच नुकसान करून घेतात. कारण एकदा का ऑपरेटर्स बाहेर पडला कि शेअर्सच्या किंमती आपोआप खाली येतात. अशा प्रकारचे काहीच मोजकेच घोटाळे बाहेर येतात. अशाच प्रकारच्या घोटाळ्यापासून गुंतवणूकदारांना सावध करण्यासाठी ऑनलाइन ब्रोकिंग एजन्सी असलेल्या Zerodha ने काही टिप्स दिल्या आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात.

Zerodha ने गुंतवणूकदारांना सोशल मीडियाद्वारे मिळालेल्या टिप्स फॉलो करून लगेचच शेअर्सची खरेदी किंवा विक्री न करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर मार्केटद्वारे झटपट पैसे कमावणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे घाईघाईने निर्णय न घेता गुंतवणूक कधीही करू नये, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकेल.

शांतपणे, विचारपूर्वक योग्य माहिती घेऊन केलेली गुंतवणूकच फायदेशीर ठरेल. याद्वारे शेअर मार्केट समजण्यासही वाव मिळेल.

जर तुम्हांला शेअर मार्केट नवीन असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडस् आणि ETF मध्येही गुंतवणूक करू शकाल. इथे थोडा वेळ देऊन शिकून मग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरु करता येईल.