हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीच्या किंवा सणासुदीच्या काळामध्ये आपले घर, आपली रूम ही सजलेली आणि सुंदर दिसावी अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु आपले घर नेमके कसे सुंदर बनवायचे आणि त्याला व्यवस्थित कसे ठेवायचे हे अनेकांना जमत नाही. काहीजण घर सुंदर बनवण्याच्या नादामध्ये वायफळ पैसे खर्च करून बाजारातून शोभेच्या वस्तू बनतात. या वस्तू घरातील जागाच मावून घेतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घर सुंदर बनवण्यासाठी अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो करून तुम्ही घर सुंदर आणि आकर्षित बनवू शकता. (Diwali Decoration)
1) घरांच्या भिंती डिझाईन करा – दिवाळीत किंवा इतर सणांमध्ये घर सुंदर दिसण्यासाठी तुम्ही घराच्या भिंती पेंट करू शकता. फक्त पेंटच नाही तर या भिंतीवर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स देखील काढू शकता. बाजारात असे काही कलर्स मिळतात जे वापरून तुम्ही घरावरील भिंतीवर नाजूक नक्षीदार अशी डिझाईन काढू शकता. या डिझाईनमुळे तुमच्या घरातील प्रत्येक भिंत सुंदर आणि आकर्षित दिसेल.
2) कंदील लावा – दिवाळीच्या सणामुळे बाजारात सध्या लहान साईजचे कंदील विक्रीस आहेत. हे कंदील तुम्ही घराच्या अंगणामध्ये तसेच तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये देखील लावू शकता. बाजारात काही कंदील हे लाईटवरील देखील मिळत आहेत. त्यामुळे या कंदील चा वापर तुम्ही रात्रीच्या वेळी करू शकता. या कंदीलमुळे तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढेल.
3) पणत्या वापरून रांगोळी काढा – दिवाळी म्हणजे हा दिव्यांचा सण असतो. त्यामुळे तुम्ही घराची शोभा वाढवण्यासाठी सायंकाळच्या वेळेत घराच्या परिसरात पणत्या लावू शकता. तुम्ही जर घराच्या अंगणामध्ये रांगोळी काढून त्यामध्ये जर दिवे ठेवले तर तुमची रांगोळी खूप सुंदर आणि आकर्षित दिसेल. तसेच तुमचे अंगण देखील सुंदर आणि सुशोभित वाटेल.
4) शोभेची झाडे लावा – तुमचे अंगण वा घर मोठे आणि सुटसुटीत असेल तर तुम्ही घरामध्ये शोभेची झाडे लावू शकता. या झाडांवर तुम्ही जर लाइटिंग टाकली तर हा नजारा पाहण्यासारखा असेल. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत शोभेची झाडे लावण्याचा प्रयोग नक्की करून बघा.
5) फुलांच्या माळा टाका – दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या घरांवर तसेच रूममध्ये फुलांच्या माळा लावू शकता. या माळा टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे घर आणखीन सुंदर आणि आकर्षित दिसेल. या फुलांमुळे तुम्हाला प्रसन्न देखील वाटेल. सध्या बाजारात दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फुले आणि त्याच्या माळा उपलब्ध आहेत.