कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शिवम्ं प्रतिष्ठानतर्फे अन्नदान : रोटरी, संजीवनी इन्स्टिट्यूट, आशा भवनला मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | सनदी अधिकारी आणि शिवम्ं प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजीत देशमुख यांच्यावतीने येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रोटरी क्लबच्या सहकार्याने अन्नदान करण्यात आले. त्याचबरोबर येथील संजीवनी इन्स्टिट्यूट आणि कोडोली- सातारा येथील आशा भवन मतिमंद मुलांच्या शाळेला आर्थिक मदत करण्यात आली.

ज्यांच्या वाणीतून महाराष्ट्रातील तरुणाईला उर्जा मिळाली, अनेकांना दिशा गवसली, व्यसनात अडकलेले कितीतरी लोक व्यसनमुक्त झाले, असे श्री. देशमुख यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात आला. समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो, आपल्या देण्याने ज्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे अशांना मदत व्हावी यासाठी सामाजीक बांधीलकीच्या भावनेतुन हा उपक्रम प्रतिष्ठानच्यावतीने राबवण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील- पार्लेकर, उपाध्यक्ष महेश मोहिते, सचिव प्रताप भोसले, खजिनदार प्रताप कुंभार, संजय पाटील, विश्वनाथ खोत, संजय शेट्टी, सचिन पाटील, संपतराव पाटील, क्लबच्या ऋता चाफेकर, शितल शहा, प्रकल्प प्रमुख बद्रीनाथ धस्के, डॉ. नंदकुमार चोपडे, डॉ. सुरेश पाटील, डॉ. सुशांत मोहिते, देवेंद्र पिसाळ, धनंजय पवार, अशोक सावंत, विकास गरुड, जगदीश खामकर, भगवान नलवडे, महेश नलवडे, उदयकुमार गाडे, इंद्रजीत गायकवाड, प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, प्रकाश पाटील, जगदीश पिसाळ, दत्तात्रय पिसाळ, गणेश कोळी, अक्षय जहागीरदार, पंकज कुंभार, विवेक कुंभार आदीसंह मान्यवर उपस्थित होते.