हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजे एटीएम मधून पैसे निघताना तुम्ही आत्तापर्यंत पहिले असेल पण ATM मधून आता अन्न धान्य मिळण्याची सुविधाही आता लवकरच उपलब्ध होणार आहे. होय, विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. वास्तविक, ओडिशा सरकार रेशन डेपोवर एटीएम मशीनप्रमाणे ऑल टाइम ग्रेन म्हणजेच एटीजी (ऑल टाईम ग्रेन) मशीनमधून रेशन देण्याची तयारी करत आहे.
ओडिशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्यासाठी ATG मशीनचा वापर केला जाईल. अन्न पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री अतानु एस. नायक यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, एटीजी मशिन ही एटीएमप्रमाणे असतील, मात्र त्यांच्यामार्फत धान्य पुरवले जाईल.
सुरुवातीच्या टप्प्यात शहरी भागात ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितले. सर्व प्रथम भुवनेश्वरमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी एक विशेष कार्ड दिले जाईल.
धान्याचे एटीएम कसे काम करेल??
या ग्रेन एटीएममध्ये तुमच्या सर्व रेशन कार्ड धारकांना तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि रेशन कार्ड वर नमूद केलेला क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची सॅक एटीएममध्ये ठेवावी लागेल आणि तुम्हाला धान्य मिळेल. सरकार सध्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत याची सुरुवात करत आहे. या योजनेअंतर्गत भुवनेश्वरमध्ये पहिले धान्य एटीएम बसवले जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, देशातील पहिले ग्रीन एटीएम गेल्या वर्षी हरियाणातील गुरुग्राममध्ये बसवण्यात आले होते. धान्याचे एटीएम बसवल्यानंतर सरकारी दुकानातून रेशन घेणार्यांचा वेळ आणि संपूर्ण मोजमाप यासंबंधीच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील. असे त्यावेळी अन्न आणि पुरवठ्याची जबाबदारी असलेले हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले होते,