चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थांचे कर 5 टक्क्यांनी कमी, तर ऑनलाईन गेमिंगवर 28 % Tax द्यावा लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपटगृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवर आकारला जाणार कर ५ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. यापूर्वी या खाद्यपदार्थांवर १८ टक्के कर आकारला जात होता. तर दुसरीकडे ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५० व्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबतचे महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

जीएसटी परिषदेच्या बैठकीसंदर्भात माहिती अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाने बैठकीपूर्वी ट्विट करुन दिली होती. यानंतर बैठकीत घेण्यात आलेले निर्णय जाहीर करण्यात आले. मुख्य म्हणजे, चित्रपटगृहांतील खाण्यापिण्याच्या साहित्यावरील कर कमी केल्यामुळे इथून चित्रपटगृहांतील खाणेपिणे स्वस्त होणार आहे. तसेच ऑनलाईन गेमिंगमध्ये कर वाढल्यामुळे आता ते तरुणांना परवडण्याच्या बाहेर जातील. यामुळे आता ऑनलाईन गेमिंगचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचबरोबर, आजवरच्या कर्करोग आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी आयात केल्या जाणाऱ्या औषधांवरील कर देखील इथून पुढे आकारला जाणार नाही. तर ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ गटाकडून ठेवण्यात आलेल्या ऑनलाईन गेमिंगवरील २ टक्के जीएसटीच्या प्रस्तावाल मंजूरी मिळाली आहे.

दरम्यान जीएसटी संदर्भात ४९ बैठका पार पडल्या असून यामध्ये दीड हजार पेक्षा जास्त निर्णय घेण्यात आले आहेत. आता देखील या ५० व्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय पार पडले आहेत. या बैठकीत निर्मला सितारामन यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मान्यवर मंडळ उपस्थित होते. यावेळी सितारामन यांनी सर्वांना यांनी ‘जीएसटी परिषद-यात्रेच्या दिशेने 50 पावले’नावाचा एक लघुपट दाखवला.