Foods For Liver Health | यकृताच्या आरोग्यासाठी आजच जेवणात सामील करा ‘हे’ पदार्थ, आजर होतील कायमचे दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 Foods For Liver Health | बदलत्या जीवनशैलीनुसार आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील खूप गरजेचे आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवच खूप महत्त्वाचा आहे. परंतु यकृत हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे यकृताची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. यकृत हे प्रथिने आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे आपले रक्त फिल्टर करण्याचे काम देखील यकृत करत असते. आजकालच्या वाईट जीवनशैलीमुळे आपल्या यकृताबद्दलचे आजार वाढायला लागलेले आहेत. त्यामुळे माणसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या सगळ्यासाठी आपले यकृत निरोगी असणे खूप गरजेचे आहे. ज्यामुळे आपले शारीरिक आरोग्य देखील चांगले राहील. आता आज आपण अशा काही खाद्यपदार्थांची ( Foods For Liver Health) माहिती जाणून घेणार आहोत जे खाल्ल्याने तुमचे यकृत देखील निरोगी राहील.

हळद

हळदीचा वापर आपण घरात रोज करत असतो. हळद ही एक अँटिऑक्सिडंट आहे. ज्यामुळे आपल्या यकृताला आलेली सूज कमी होते. आणि ऑक्सिडीटीव्ह देखील कमी होतो आणि आपले यकृत निरोगी राहते. ( Foods For Liver Health)

ब्रोकोली

ब्रोकोली ही देखील अँटिऑक्सिडंट आणि फायबरने समृद्ध आहे. ब्रोकोली हे यकृताचे डीटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करते. त्यामुळे यकृताचे काम चांगल्या पद्धतीने चालते.

बीटरूट |  Foods For Liver Health

बीटरूटचा वापर आपण सगळेच करत असतो. या बेडरूटमध्ये बीटेन असते जे यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करण्यास मदत करते. त्यामुळे यकृत खराब होण्यापासून त्याचप्रमाणे जळजळ होण्यापासून लांब राहते.

आले

आल्या मध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे यकृताची सूज कमी होते आणि आपल्या यकृत देखील निरोगी राहते.

फॅटी मासे

फॅट इमासांमध्ये ओमेगा – 3 ऍसिड असते. ज्याला हेल्दी फॅट असे म्हटले जाते. हे खाल्ल्याने यकृताची जळजळ कमी होते आणि आपल्याला हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता देखील कमी होते.

ग्रीन टी

आज-काल अनेक लोक ग्रीन टीचा वापर करायला लागले आहेत. कारण या ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट असते. जे आपले यकृत आणि शरीर निरोगी ( Foods For Liver Health) ठेवण्यासाठी मदत करतात. यकृतातील एंजाइमची पातळी देखील नियंत्रित ठेवण्यासाठी ग्रीन टीचा वापर होतो.