Foods To Increase Platelets : डेंग्यूमूळे शरीरातील प्लेटलेट्स झाले कमी? तर आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Foods To Increase Platelets) पावसाळ्यात जिथे तिथे पाणी साचते आणि यामुळे डासांची संख्या वाढते. परिणामी, अनेक भागात डेंग्यू, मलेरिया सारखे साथीचे आजार हातपाय पसरतात. डास चावल्याने डेंग्यू झालेल्या रुग्णाची रोग प्रतिकार क्षमता कमी होते. शिवाय शरीरातून प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळे इतर समस्यांना देखील तोंड द्यावे लागते. थकव्यामुळे काहीही काम करणे होत नाही. काम सोडा, अशा रुग्णांना साधं उठणं बसणं सुद्धा मुश्किल होऊ लागतं. अशावेळी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करावा लागतो. त्याच पदार्थांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे. जो होऊन गेल्यानंतर केसगळती, शारीरिक थकवा आणि इतर आरोग्यविषयक समस्या जाणवतात. यामागील कारण म्हणजे, शारीरियातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे. डेंग्यूमुळे रुग्णाच्या शरीरात प्लेटलेट्सचे प्रमाण मोठ्या संख्येने कमी होते आणि त्यामुळे इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. (Foods To Increase Platelets) म्हणूनच डेंग्यू होऊन गेल्यानंतरही आपल्याला आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायला हवी. यासाठी आपल्या आहारात काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ञ देतात. डेंग्यू झालेल्या रुग्णांना व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि फोलेटने समृद्ध पदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. ज्यामुळे आपल्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढते आणि इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते. चला या पदार्थांविषयी सविस्तर माहिती घेऊ.

1. किवी

किवी हे फळ शरीरात कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. (Foods To Increase Platelets) कारण, यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्याचा फायदा प्लेटलेट्स वाढीसाठी होतो.

2. डाळिंब

डाळिंब हे एक असे फळ आहे जे खाल्ल्याने शरीराला एकाचवेळी अँटी ऑक्सिडंट्स आणि लोह एकत्र मिळते. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते.

3. आवळा (Foods To Increase Platelets)

बहुगुणी आवळा हा अनेक गंभीर आजरांवर प्रभावीपणे काम करतो. यातील अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सीमूळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी मदत करते.

4. दही

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवायची असेल तर रुग्णांनी आपल्या आहारात दही खाण्यास सुरुवात करावी. यातील अनेक गुणधर्म आरोग्यदायी ठरतात. दही खाल्ल्याने बोन मॅरोची प्लेटलेट निर्मिती क्षमता वाढते आणि शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने वाढते.

5. भिजवलेले मनुके

डेंग्यूच्या रुग्णांनी आहारात भिजवलेले मनुके खाल्ल्याने देखी प्लेटलेट्सची संख्या वाढते. (Foods To Increase Platelets) कारण भिजवलेल्या मनुक्यांमध्ये आयर्नची मात्रा जास्त असते. ज्यामुळे कमी वेळात प्लेटलेट वाढवण्यासाठी मदत होते.

6. पपईचे पान

ज्या लोकांना डेंग्यू होऊन गेला आहे आणि त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाले आहेत त्यांनी पपईचे पान खाणे फायदेशीर ठरेल. कारण यामध्ये फायटो केमिकल्स असतात. (Foods To Increase Platelets) जे शरीरात कमी झालेले प्लेटलेट वाढवण्यास मदत करतात.

7. इतर पदार्थ

डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन बी ९, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सीने समृद्ध पदार्थांचा समावेश करायला हवा. यामध्ये मसूर, बीन्स, अॅवोकॅडो आणि इतर धान्ये व्हिटॅमिन बी ९ देतात. (Foods To Increase Platelets) तर फळे, पालक, हिरव्या भाज्या, ब्रोकोली, मोड आलेली कडधान्य, शतावरी यातून आपल्याला व्हिटॅमिन के मिळते. संत्री, लिंबू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, सिमला मिरची यातून व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात मिळते.