हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. भाऊ-बहिणीच्या या सणाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. भारतात लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात. पण आपल्या देशात असे एक गाव आहे जिथे शतकानुशतके रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण साजरा केला जात नाही.
या गावामध्ये रक्षाबंधनाला (Raksha Bandhan) एकाही पुरुषाच्या मनगटावर राखी नसते. उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून 30 किमी अंतरावर असलेल्या मुरादनगरच्या सुराणा गावात १२व्या शतकापासून लोक रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण साजरा करत नाहीत. या गावातील सुना आपल्या भावांना राखी बांधतात, मात्र या गावातील मुली रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण साजरा करत नाहीत. एवढेच नाही तर या गावातील लोक इतरत्र स्थायिक झाले असेल तरी ते देखील रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत. गावातील लोक रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा दिवस काळा दिवस मानतात.
का साजरा करत नाहीत हा सण ?
काही लोकांचा असं म्हणणं आहे की, 1206 मध्ये रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) दिवशी मोहम्मद घोरीने गावावर हत्ती घेऊन हल्ला चढवला होता. आक्रमणानंतर काही वर्षांनी हे गाव पुन्हा वसवलं गेलं. कारण त्या दिवशी गावातील एक मूळ रहिवासी असलेली ‘जसकौर’ ही महिला तिच्या माहेरी गेली होती. कारण ती त्यावेळी गर्भवती होती. जेव्हा घोरीने हल्ला केला तेव्हा ती गावात नव्हती आणि म्हणूनच ती वाचली होती. यानंतर जसकौर हिने ‘लकी’ आणि ‘चुंडा’ या दोन मुलांना जन्म दिला आणि दोन्ही मुले मोठी होऊन सोनगढमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी हे गाव पुन्हा वसवलं. दरम्यान, गावातील काही लोकांनी रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) सण साजरा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या घरांमध्ये काही दुर्घटना घडल्या ज्यामुळे पुन्हा कोणीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला नाही.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???