टीम हॅलो महाराष्ट्र । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच्या आपल्या अजब वक्तव्यावरून चर्चेत असतात. असच एक वक्तव्य ट्रम्प यांनी नुकतच केलं आहे. “इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी याला ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेचं रक्षण केलं आहे. त्यामुळे आता मला शांततेचं नोबेल द्यायला हवं” असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
कासिम सुलेमानीला ठार केल्याचा मुद्दा ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उचलून धरत प्रचाराला सुरुवातही केली आहे. “शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मला आत्तापर्यंत मिळालेला नाही. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना २०१९ मध्ये शांततेचा नोबेल देऊन गौरवण्यात आलं होतं. हाच संदर्भ देऊन ट्रम्प म्हणाले की आता या पुरस्कारासाठी माझा विचार व्हायला हवा.” असं सांगत आहेत. ट्रम्प यांनी सुलेमानीला ठार करण्याचे आदेश दिल्याबद्दल मला शांततेचं नोबेल द्या अशी मागणी ट्रम्प यांनी केली असतानाच दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाने सुलेमानीला ठार करण्याचे आदेश दिल्याच्या निर्णयावरुन ट्रम्प यांच्यावर टीका केली.
THANK YOU TOLEDO, OHIO!https://t.co/PL96KjQWat
— Donald J. Trump (@realDonaldTrump) January 10, 2020