संघासाठी लसीकरण केंद्रावरील विषय संपला, आता राजकारण कोण करत आहे तो ज्यांचा त्याचा प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी 10 मे रोजी लसीकरण केंद्रावरील जो काही प्रकार घडला आहे. त्याविषयी राष्ट्रीय संघाचा राजकीय अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला असे म्हटले गेले. यात काही राजकीय अजेंडा आहे? संघाला तेथील बेबनाव, अव्यवस्था अवडलेली नाही, सामान्य माणसाला होणार त्रास बघावला नाही. त्यामुळे आम्ही पुढे आलो होतो. आता या विषयाचे कोणी राजकीय भांडवल तर करीत नाही ना? समाजाने या विषयाकडे राजकारण म्हणून पाहू नये. संघटना राजकीय अजेंडा राबवत असे आरोप करणे चुकीचे आहे. आमची भूमिका स्पष्ट केली आहे, आमच्यासाठी विषय संपला अजून त्यामध्ये आता कोण राजकारण करत आहे. त्याला कोण उत्तर देत आहे, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे, असल्याचे संघाचे श्री. जोशी यांनी सांगितले.

श्री. जोशी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवकांकडून नेहमीच समाजावर आपत्ती आली की स्वताः हून काम केले जाते. कोरोनाच्या काळातही शासनाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे काम सुरू झाले. अनेक दिवस आम्ही पाहत होतो. लसीची कमतरता आणि नागरिकांचा प्रतिसाद हे प्रमाण व्यस्त होते. एका बाजूला माणसांचा वाढणारा लोढा आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाने कितीही इच्छा व्यक्त केली तरी त्यांची असणारी अव्यवस्था यांच्यामुळे गर्दी खूप व्हायला लागली. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या मनात आले की आपण मदत करायला गेले पाहिजे. त्यावेळी आम्ही वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाच्या अधिक्षकांना रितसर अर्ज करून विनंती केली. तेव्हा त्यांनी आम्हांला परवानगी दिली.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/2786538661608608

संघ तेथे काय काम करत होते

आम्ही त्याठिकाणी 8 मे पासून गर्दी कमी करण्यासाठी काम करत होतो. तेथे येणाऱ्या लोकांच्या व्यवस्थित रांगा लावत होतो. त्यांची नोंदणी झाली होती का, तेथील अव्यवस्था संपायला लागली, लोकांना चांगली व्यवस्था आहे असे वाटायला लागले. त्यामुळे प्रशासनाला आमची मदत होत होती, तसे त्यांनी बोलूनही दाखवून दावले.

सोमवारी घडलेला नक्की प्रकार काय

दुर्देवाने, सोमवारी जी घटना घडली त्यादिवशी पहाटे पाच वाजता आलेले नागरिक होते. त्यांनी स्वताः ची नांवे लिहून ठेवलेली होती. सकाळी पाच ते दहा म्हणजे पाच तास उभे राहायचं म्हणजे थोडाफार विस्कळितपणा येणारच. पावणे अकरा वाजता नावे नोंदवलेली लोक उभे राहू लागली तेव्हा एक व्यक्ती रांगेत उभा राहत होता. त्यास बाजूला काढल्याने तो मनुष्य चिडला. त्या मनुष्याला वाटले की ठराविक माणसांनाच आतमध्ये सोडले जात आहे. वास्तविक असे काही होत नव्हते. त्या व्यक्तीने ही बाब एका राजकीय कार्यकर्त्यांकडे तक्रार केली. राजकीय कार्यकर्त्यांने दोन्ही बाजू समजून घेतली असते तर पुढचा विषय टळला असता. त्यांनी संघाचे कार्यकर्ते शासकीय रूग्णालयातील, शासकीय माणसांना काम करत असल्याचे, त्यांना का वाईट वाटले आम्हांला काही माहीती नाही. तेव्हा पोलिसांनी आम्हांला सांगितले की तुम्ही काम थांबवा, तेव्हा आम्ही काम थांबवले असे श्री. जोशी यांनी सांगितले.

Leave a Comment