Force Citiline : आता संपूर्ण कुटुंबासोबत करा प्रवास; लाँच झाली भलीमोठी कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समजा एखाद्याचे मोठं कुटुंब असेल तर बाहेर कुठे जाताना सर्वांना एकत्र जाण्यासाठी अडचण निर्माण होते. याचे कारण म्हणजे सध्याच्या कार किंवा जीपमध्ये जास्त लोक बसत नाहीत. परंतु आता तुमच्या या अडचणीवर उपाय सापडला आहे. देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी फोर्स मोटारने आपली नवी एमपीवी Force Citiline लाँच केली आहे. या गाडीमध्ये 10 प्रवासी आरामात प्रवास करू शकतात. 15.93 लाख रुपयांच्या किंमतीत ही भलीमोठी गाडी कंपनीने लाँच केली आहे.

या MPV च्या साईज बद्दल सांगायचे झाल्यास, हिची लांबी 5120 मिमी, रुंदी 1818 मिमी आणि उंची 2027 मिमी आहे. Force Citiline मध्ये 191 मिमीचा ग्राऊंड क्लीअरन्स मिळतो. कंपनीने ही गाडी फक्त एकाच व्हेरिएन्ट मध्ये लाँच केली आहे.

Force Citiline

आरामदायी सिटिंग अरेंजमेंट-

गाडीच्या (Force Citiline) सिटिंग अरेंजमेंट बद्दल सांगायचे झाल्यास, समोरच्या आसनांसह (2+3+2+3) अशी आसन मांडणी करण्यात आली आहे. पहिल्या लाईनमध्ये 2 लोक, दुसऱ्या लाईन मध्ये 3 जण, तिसऱ्या लाईन मध्ये परत 2 जण आणि चौथ्या लाईन मध्ये परत 3 लोक आरामात बसू शकतात. यामधील दुसरी जी लाईन आहे त्यामधील सीटला 60:40 मध्ये फोल्ड करता येते. यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमध्ये आरामशीर बसता येते. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाल तेव्हा या गाडीतून तुम्ही अतिशय आरामदायी आणि सुखद असा प्रवास करू शकता.

Force Citiline

इंजिन आणि पॉवर – Force Citiline

फोर्स मोटरने आपल्या या Force Citiline मध्ये 2.6 लिटर सिलेंडर कॉमन रेल टर्बो डिझेल इंजिन वापरले आहे. हे इंजिन 5 स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सला जोडलं असून 91 BHP पॉवर आणि 250 NM टोर्क जनरेट करते. या गाडीमध्ये 63 लिटरचा फ्युएल टॅंक मिळतो.

फीचर्स-

गाडीच्या अन्य फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॉवर स्टेरिंग, मागे बसणाऱ्या व्यक्तींना वेगळा AC, यांसारखे फीचर्स मिळतात तर सस्पेंशनमध्ये टॉर्शन बार फ्रंट स्प्रिंग आणि रियर पॅराबॉलिक लीफ स्प्रिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

हे पण वाचा :

MG Comet : इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटला करंट द्यायला येतेय MG मोटर्सची नवी गाडी; पहा लूक..

Toyota Innova Hycross चे बुकिंग थांबवलं; कंपनीने दिले हे कारण

Kia Sonet नव्या अंदाजात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Citroen eC3 इलेक्ट्रिक कार लाँच; 320 किमी रेंज