नवी दिल्ली । भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता त्यांनाही इथे कोरोनाची लस मिळू शकेल. परदेशी नागरिक आता CoWIN अॅपवर कोरोना लसीसाठी रजिस्ट्रेशन करू शकतील. विशेष गोष्ट म्हणजे या अर्जावर रजिस्ट्रेशन साठी विचारलेल्या फोटो आयडीमध्ये ते आता आपला पासपोर्ट टाकू शकतील.
गुरुवारी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे की,”आता परदेशी नागरिकांना लसीकरण करण्यासाठी CoWIN अॅपवरील फोटो आयडी रूममध्ये पासपोर्ट स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, या लोकांना लसीकरण करण्यासाठीचे उचललेले हे पाऊल कोरोनाचा प्रसार रोखेल तसेच परदेशी नागरिकांना कोरोनापासून वाचवेल.”
कोविड -19 लस मिळवण्यासाठी, भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना पहिले CoWIN पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. जर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर ते त्यांच्या पासपोर्टचा वापर करून या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकतात. आतापासून, CoWIN पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी पासपोर्ट हे ओळखपत्र म्हणून व्हॅलिड केले गेले आहे. जेव्हा ते या पोर्टलवर रजिस्टर्ड होतील, तेव्हा त्यांना लसीकरणासाठी एक स्लॉट देण्यात येईल.
मंत्रालयाच्या वतीने असे म्हटले आहे की,” देशातील 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी देशभरात मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 52 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस मिळाला आहे. अशा परिस्थितीत, कोरोनाला हरवण्यासाठी हे पाऊल प्रभावी आहे.”